STORYMIRROR

Girish S

Others

3  

Girish S

Others

काळ-वेळ

काळ-वेळ

1 min
123

महानगरीत गेले गावातील चाकरमानी, 

लोकल त्या नगरीची धमनी, 

रांगेतुन घेऊन तिकीट शिरले ते स्टेशनात,

 ट्रेन पकडली धांवत धांवत,

दोन तीन ट्रेन मधून फिरून काम करून आले परत, होवून श्रांत, 

रुळ ओलांडून जात होते सगळेच सहज, 

तीघांपैकी दोघे सरावलेले, गेले ते ही सहज,

तीसरा उतरला रूळावर पण

चुकीच्या जागेवर ! 

वर जाता येइना, चालू लागला बघत जागा,

ऐकू आले शब्द "अरे ट्रेन आली" तो स्तब्ध, 

गेट कडून येत होता सहकारी ,

वेगाने पोचला जवळ, ओढून घेतले त्याला त्वरेने,

 जागा झाला तो ट्रेनच्या आवाजाने,

दोघांना तेव्हा कळले काय असते धडधडणे,

 यालाच म्हणतात देवासारखा येणे काळ येणे पण वेळ टळणे.

(१ - सहज वाटणाऱ्या गोष्टी सहज नसतात.२ - घटना घडून जातात. क्षणा क्षणाला महत्व असते. ३- असं कसं केलेस या प्रश्नाला उत्तर नसते. ४- काळ आला होता पण वेळ आली नव्हती . ५. काय घडतेय ते समजून घेऊन कृती करणारा माणूस मिळाला तो देवासारखा. वेळ टळवणारा.)


Rate this content
Log in