जगावे कसे ?
जगावे कसे ?
जगावे कसे?
जायचे कुठे, कसे हे आधी ठरावे,
जीवनमार्गावर पाऊल मग पडावे.
खायचे काय आणि किती हे कळावे,
मर्यादेच्या चौकटीत सुख नांदावे.
मिळवायचे काय, किती हे उमजावे,
मनात हव्यासाला जागा न द्यावी,
वाचवायचे किती याचे भान असावे,
उधळपट्टीने भविष्य न हरवावे.
पळायचे किती, केव्हा थांबावे,
हेच शहाणपण आयुष्यात शिकावे
मृत्यूचीच खात्री या जगात खरी,
जगणे मात्र असावे सजग, समाधानी, खरे.
गिरीश.
