नाम
नाम
1 min
4
माणूस झाला मोहाचा दास,
आस त्याला देहाची खास,
रोग असे कधी कारण दु:खाचे,
देह सुदृढ जरी दुःख वेगळे तयाचे,
रोग असे शरीराला, सावली जशी साथीला,
आले गेले अनेक, चालु येरझार,
माहित असे जरी येणारा प्रत्येक जाणार !
वियोगाचे दु:ख अपार ,
भोग कुणाचे न कुणी दिले न कुणी घेतले,
जे केले ते सुखासाठी, मिळवले अधिकार, संपत्ती, संतती साठी सगळे केले,
भले केले ज्यांचे ते गेले विसरून ,
स्वार्थी जग हे राहावे समजून
मान सन्मान, संतती, संपत्ती न नेई समाधानाप्रती
ज्याने घेतले नाम व भक्तित रमला
परमात्मा तारेल त्याला ,
सतत जपा राम नामाला.
