STORYMIRROR

Girish S

Inspirational

4  

Girish S

Inspirational

शब्दांची ताकद

शब्दांची ताकद

1 min
11

शब्द देतात प्रेमाचा संदेश, शब्द देतात प्रेमाचे संकेत, कधी विचार करायला भाग पाडतात
तर कधी दुःखी करतात.
शब्दातून कधी होतो आनंद व्यक्त. तिरस्कार आणि राग ही कधी होतो व्यक्त.
कधी शब्द करतात तुमचा दिवस सुखाचा. कधी शब्दांचा आघात असा की दिवस जळफळाटाचा.
शब्द बोचतात, काळजाला घरं पाडतात, निराशही करतात.
शब्दच देतात आधार, उत्साह, प्रेरणा.
चला या शब्दामार्फत आपण आनंद पसरवुया, प्रेम वाढवुया, जागवुया नवा उत्साह,
स्फुर्तीचे शब्द बोलुया, शांतीचा संदेश देऊया, ह्रदये आनंदानी भरुया.
आशिर्वादाच्या शब्दानी लोकांना आनंद व समाधान देउया.
शब्द देतात रुग्णाना बरे होण्याची शक्ति,
हार मानु लागलेल्याना देतात जिंकण्याची शक्ति.
शब्दानी फिटो अंधाराचे जाळे.
आपण फक्त स्फुर्तीदायक शब्द बोलूया.
बोलू आधार देणारे शब्द, उमेद देणारे शब्द.
कौतुकाचे शब्द, स्तुतीपर शब्द बोलूया.
शब्दाद्वारे प्रकाश पसरवुया.
शब्दांनी आशा, प्रेम, शांती चे संदेश देऊया.
शब्दांनी देऊ स्वास्थ्य, धैर्य व वैभवप्राप्तीचे संदेश.
   गिरीश


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational