STORYMIRROR

Girish S

Classics

4  

Girish S

Classics

नदी

नदी

1 min
10

नदी आणि सागर नदी पोहोचते सागराच्या उंबरठ्यावर… क्षणभर थांबते. भीती दाटते तिच्या मनात — या अथांग सागरात विलीन व्हायचं? ती मागे वळून पाहते — डोंगरमाथ्यांतून सुरू झालेला प्रवास, जंगलांची साथ, खेड्यांतून वाहताना मिळालेलं आपलेपण, खाचखळग्यांची वाट, आणि संघर्षांची वळणं… आता समोर आहे सागर — असीम, अथांग, अनंत. आत गेल्यावर परत येणं शक्य नाही. मागे फिरणंही शक्य नाही, कारण प्रवाह थांबत नाही. मग धैर्य एकवटून ती टाकते एक पाऊल पुढे… स्वतःला अर्पण करते सागराला. आणि त्या विलीन होण्याच्या क्षणी तिला कळतं — ती हरवत नाही, तर विस्तारत जाते. तीच बनते त्या विशाल सागराचा अंश… अनंत, अमर, असीम. — gs


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics