आयुष्य
आयुष्य
आयुष्य वाटते घडावे मनासारखे,
वाटते रस्ते नसावेत खांचखळग्यांचे,
म्हणुन काय इच्छाच ठेवायच्या नाहीत ? रस्ताच सोडायचा कां मार्ग बदलायचा, निर्वाहासाठी कमी पडत असेल निधी,
हसावेसे वाटुन पण टाकावा लागत असेल उसासा,
काळजीपूर्वक चालुन पण बोचत असतील कांटे,
करावी लागत असेल काळजी,
होउ नकोस निराश, घेउ नकोस माघार,
किती वळणं, किती गतीरोधक, अशी जरी असेल वाट,
तरी कमी करू नकोस वेग,
प्रयत्नांना तुझ्या यश देईल दाद,
जीवाला जीव देणारे देती तुला साथ,
देशील जेव्हा साद, मन खुले करून,
निराशा झटकुन, मनाची उभारी धरून,
करूनी स्वपरीक्षण, चालव आयुष्याचे जहाज, पारखुन प्रवासी, सोडू नकोस जहाज. गिरीश
