उन्हातलं झाड...
उन्हातलं झाड...
उन्हातलं झाड हिरवंगार दिसतं,
पाणी नाही त्याला कुठून पाणी मिळवतं...
उन्हातलं झाड सुकलं नाही अजून,
दिसलं जरी वाळलेलं ठेवलं त्याने खत धरून...
उन्हातलं झाड मिळवतं ड जीवनसत्त्व,
उन्हातल्या झाडाने जिवंत ठेवलं ममत्व...
उन्हातलं झाड देते प्रत्येकाला सावली,
प्रत्येक झाड झालं माझ्यासाठी माऊली...
