Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Inspirational

4  

Manisha Awekar

Inspirational

उंबरठा ओलांडला

उंबरठा ओलांडला

1 min
218


उंबरठा अडसर , स्त्रीला अडवणारा

प्रगती रोखूनी , घरी थांबवणारा


कष्ट , दुःख , अवहेलना , जीवनी कुचंबणा

स्थान तिचे वामांगी , अपमान जीवघेणा


फुले दांपत्याने केले , शिक्षणाचे खुले दार

जणू स्त्रीच्या प्रगतीचे , उघडले नवे दार


शिक्षणाने बदलले , स्त्री भवतीचे विश्व

ज्योतिबा नि सावित्रींनी , केले तिजला आश्वस्त


ओलांडूनी उंबरठा , स्त्री नव्या जगी आली

उच्च शिक्षण घेऊनिया , समबुद्धी सिद्ध केली


बुद्धीचातुर्याने तिने , समता सिद्ध केली

सर्व क्षेत्रे जिंकूनिया , वर्चस्व मुद्रा उमटवली


नवनवी कार्यक्षेत्रे , झाली कर्तृत्वास खुली , 

भूदलाचे रणांगण , अवकाश , पाणबुडी


मार्गातील कंटकांस , फटकारे उडविले

स्थान ज्याचे त्याला , त्वरे दाखवुनी दिले


नव्या युगी नववाटा , नवी आव्हाने दावती

क्षितीजही तिचे आता , विस्तारुनी उभारती


नव्या युगाची ललना , कार्यक्षम नारी आता

उंबरठा ओलांडुनिया , ती नव्या युगाची आशा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational