उमलत्या सोनकळ्यांनो
उमलत्या सोनकळ्यांनो
या उमलत्या सोनकळ्यांनो , शारदेच्या मंदिरी या
वीणेच्या मंजूळ स्वरात , जीवनाचे गीत गा ...
सजली आता शाळा ही , बकुळीच्या फुलापरी
नका बाळगू उरी आता , शिकण्याची भीती बावरी ...
लाभेल तुम्हाला येथे , माऊलीचा मृदुल स्पर्श
शाळेत तुम्हांस पाहता , होईल मनाला हर्ष ...
अंधारलेली मने येथे , उजळतील प्रकाशात
ज्ञानतृष्णा भागेल तुमची , या ज्ञानसागरात ...
बहरतील तुमची स्वप्ने , येथे फुलेल जिज्ञासा
गगनभरारी घेण्याची , मनी वसेल आशा ...
होतील पाढ्यांची , येथे रोज आव॔तने
कविता पठणांचे घोष अन् मौलिक सुवचने ...
आयुष्याचे धडे गिरविण्या , या सावित्रीच्या लेकींनो
अस्तित्वाचा शोध घेण्या , या ओजस्वी दीपिकांनो ...
या उमलत्या सोनकळ्यांनो .....