STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Classics

3  

Asmita prashant Pushpanjali

Classics

उजळणी आयुष्याची।

उजळणी आयुष्याची।

1 min
614

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर व्हावी उजळणी आयुष्याची।

जीवनाच्या कोऱ्या पन्यावर व्हावी उजळणी आयुष्याची।


मागे वळून आठवणीच्या गाठी उकलतांना।

सरकत्या वाळूच्या कणांवर व्हावी उजळणी आयुष्याची।


जिवनातील खाच खळ्ग्यांची मनी बांधून गाढ।

अनुभवाच्या शिदोरीवर व्हावी उजळणी आयुष्याची।


मागे जे काही धडे गिरवले नाही।

पुन्हा पुन्हा अर्धावर व्हावी उजळणी आयुष्याची।


मित्रांसोबत गप्पांच्या मैफिलीत रंगतांना।

आठवणीत अलवर व्हावी उजळणी आयुष्याची।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics