उधळू आनंदाचे चांदणे
उधळू आनंदाचे चांदणे
स्वातंत्र्याच्या नभात या रे,
उधळू आनंदाचे चांदणे,
एकजुटीने राहूया सारे,
चांदण्यात या गाऊ प्रेमाने.
सर्वधर्मसमभाव मिळुनी,
जपूया आपण साऱ्यांनी,
ठेवूया हो ध्यानी मनी,
थोरामोठ्यांच्या त्या शिकवणी.
स्वातंत्र्य मिळवण्या झगडले,
कितीक अमर हुतात्मे झाले,
बाळगू स्वप्न उज्ज्वल भवि
ष्याचे,
जे होते स्वातंत्र्यवीरांनी पाहिले.
नसो कुणी दीन, दुबळा,
ठेवू साऱ्यांप्रती आदर सन्मान,
परस्री मायभगिनी मानूनी,
तिरंग्यासह वाढवू देशाची शान.
भारत माझा देश महान,
गाऊया गीत सारे हर्षाने,
स्वातंत्र्याच्या नभात या,
उधळू आनंदाचे चांदणे.