STORYMIRROR

Nalanda Wankhede

Inspirational

4  

Nalanda Wankhede

Inspirational

विसरून गेले सत्य

विसरून गेले सत्य

1 min
520


शोषितांचा फुलविला मळा

सोसुनी बाबांनी कष्ट

विसरून गेले सत्य

सारे सुशिक्षित भ्रष्ट


विसरून गेले सत्य

माय ती जननी जन्मभूमी

ठेवून तिला वृद्धाश्रमात

लेकरं विसरले त्यांचीे कर्मभूमी


विसरून गेले सत्य

मरावे परी किर्तीरूपे उरावे

थोतांड पसरले समाजात

सज्जनांनी कसे जगावे


विसरून गेले सत्य

वीरसैनिक झटले देशासाठी

पार पाडले आपुले कर्तव्य

आणि वीरगतीला झाले प्राप्त


नालंदा वानखेडे, नागपूर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational