उभारी
उभारी
नकळत संकंटे समोर आली
निराशेने ग्रासले गेले कधी
कळलेच नाही मला कधी!
कळले तेंव्हा अंधार दाटला!
आतूनच स्वतःला उभारी देत
शोधला आशेचा किरण सभोवताली
शोधतांना तोल जात होता
तरी घट्ट मनात रोवला
एक आशेचा किरण!
बाहेर पडतांना उंच झेप घेण्यापेक्षा
पेलली छोटी छोटी आव्हाहने
साजरे केले ते छोटे छोटे आनंदी क्षण!
आनंदी रहाण्याने पेलले इंद्रधनुष्य
मिळाले मानसन्मान!
माझ्या अनुभवानचे क्षण
सांगते दुसर्यांना देण्या त्यांना उभारी जगण्या जिवन!
