तयारी कोरोनास हरवण्याची
तयारी कोरोनास हरवण्याची
जर तयारी असेल मनाची
हरवण्यास कोरोनास,
पाळावे लागतील मनापासून
काही कठोर नियमांस.
पुढचे काही दिवस
ठेवा स्वतःस अलग करून,
दिसता काही लक्षणे
घ्या औषधे डॉक्टरास विचारुन.
स्वच्छ ठेवा परिसर
तसेच स्वतःचे आरोग्य,
सवय लावा सगळ्यांनी
वारंवार हात धुणेचे योग्य.
करा वापर सॅनिटायझरचा
अनावश्यक स्पर्श टाळा,
मास्क वापरा योग्य रीतीने
तेव्हाच बसेल कोरोनास आळा.
बाहेर निघताच असावे भान
सुरक्षित अंतर ठेवण्याचे,
लसीकरण काळाची गरज
प्रण करावे स्वतः घेण्याचे.
