त्याहुनी
त्याहुनी
ह्या सुखद क्षणांना आता
काट्यांची तमा नाही...!
आता व्हायचे ते होवो
जरी चुकीला क्षमा नाही....!
या ऐलतटावर सखा साजणा,
पैलतटावर सखा हरी...!
ही मोहमाया अवती भोवती,
मोक्ष च ध्येय जरी...!
अमृताहूनी गोड जरी,
नाव तुझे देवा...!
माझ्या सख्या सजनाचा संग
त्याहूनी मजला हवा...!

