त्यागमूर्ती रमाई
त्यागमूर्ती रमाई
कर्तृत्वाची किर्ती
त्यागाची ही मूर्ती
जगण्याची स्फुर्ती
माझी रमाई
सोसूनिया भार
केलाया संसार
मानली ना हार
माझी रमाई
दिव्य ज्योती स्थान
भीम स्वाभिमान
कारुण्याची खाण
माझी रमाई
नायक निर्माता
भाग्याची विधाता
जगाची तू माता
माझी रमाई
स्मृतीचा सुगंध
लाजला चंदन
करतो वंदन
माझी रमाई
सापडला सूर
भीम कोहिनूर
तुझे उपकार
माझी रमाई
वादळाची गती
शक्ती त्याग प्रीती
रामू तू भिमाची
माझी रमाई
