त्या अखेरी
त्या अखेरी
एक अश्रू दे अखेरी, तुला सांगतो मी
तुला सोहळे सुखाचे, कुठे मागतो मी
जमेल का तुला, येण्या माझ्या अखेरी
प्रिये तुझे बहाणे, बरे जाणतो मी
तुझ्याविनाच आज, या सरतील वाटा
दिवाणा इथे एकटाच, तरी चालतो मी
आनंदून माझी, वाट पाहती स्मशाने
पुढे पाऊले अखेरची, अता टाकतो मी
दिसे चित्र आपले, रंगहीन काढलेले
रंग आसवांचे जरा, तयात सांडतो मी
