STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

4  

Abasaheb Mhaske

Inspirational

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार

1 min
1.2K

नाही कुणा कसली खंत ...

ज्याला त्याला पोटाचीच भ्रांत 

स्वयंघोषित कुणी संत ...

भारला कसा सारा आसमंत ?


खूप काही घडतंय ...

बरच काही बिघडतंय 

दोष तरी कुणा द्यावा ?

ओलेसुके जळते अग्निसाक्षी 


काही काही कळेनासा झालंय... 

प्रवास अमुचा भ्रमिष्टासारखा  

माणूस म्हणण्यास लाज वाटते 

पत त्यांची क्षणोक्षणी घटते 


आम्ही फक्त साक्षर झालोय ...

सुसंस्कृत होणे राहूनच गेलंय 

दोष कुणाला कशास द्यावा ...

सारं पाप आपलेच माथी 


जनावरही सहसा स्वजातीला नडत नाही ...

माणूस मात्र माणसासारखा वागत नाही 

नडल्याबिगर अन आपापसात भीडल्याबिगर 

माणसाला चैन पडत नाही, इतिहासातून काही शिकत नाही  


आम्हीच दिल्यात चाव्या त्यांच्या हाती ...

बघत बसा आता खुशाल तमाशा सारा 

म्हणू नका पुन्हा असं- कसं घडलं ?

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार गड्या   


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational