तूच माझी
तूच माझी
सोड अबोला, ओसंडून वाहू दे अंतरीच्या भावना
भेद मनीचे सखी आता तरी खोल ना
होकार नकार काहीही असो, प्रेमाचाच तो भाग ना
डोळ्यांमधूनि खुशाल उमटू दे शब्दातीत भावना
सांग प्रिये तुजविण मी अन माझ्याविना तू कशी ?
मूक व्हावे शब्द सारे सूर, ताल, लयही हरवून जावी जशी
का वसवलास सखे विरहाचा गाव, खाऊन नाहक अनाठायी भाव तू
दिल्या घेतल्या आनाभाकांची शपथ तुला, स्पष्ट काय ते बोल ना
जीवन आपुले गीत व्हावे, हात हाती तुझा असावा
मिठीत तुझ्या हरवून जावे, जगाचाही विसर पडावा
झाले गेले विसरून सारे, पाहुनी डोळ्यात तुला म्हणावं
मीच तुझा मीत प्रिये, तूच माझी प्रीत ना ?

