STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Abstract

3  

ANJALI Bhalshankar

Abstract

तू येतोस तेव्हा......

तू येतोस तेव्हा......

1 min
255

किती बरसायचे ते जा बरसून, गळके घर माझे जीव जातो तरसून.

नाही सांगायला कोणी नाहीं ऐंकायला कोणी, तुलाच सांगते दरवर्षी ची गारणी........1


तू आलास की माझा सारा गोंधळ उडतो.

कसे कुठे, थोपवू तुला हा प्रश्न पडतो.

तुुुझे आभाळ फाटतेे तिथे, भिजले घरटे,पाहुन मन रडते ईथे.

तुला साांधता सांधता जीव मेटाकुटीस येतो. सारया डोळा कोरडा कोपरा शोधतो....................2


तू येतोसच!का ? न सांगता अचानक असा रे.

तुझ्या सरींचा वर्षाव डोळयातील पाण्यापुढे फीका रे.

मोजून बघ!थेेंब तुझे, वाहणारया माझ्या अश्रुचेही

अश्रूच भरतील जास्त मोज कधिही कोठेही कसेही...............................................3


सोड राहुुदे रडगाणे!! नेेहमीचेच माझे सारे जग सज्ज होण्या ऊतराई तूझे.

शेतकरी रााजा पोंशिदा सारया जगाचा.

त्याने, घेतलाय  ध्यास केव्हाचा तुुझ्या येण्याचा,

कर तयाला, जगालाही तृप्त मनसोक्त बरसून,

घर काय माझे ओले जाईलच ऊदया तरी सुकून............. ....................................4


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract