तू येण्याच्या वाटेवर
तू येण्याच्या वाटेवर
तू येण्याच्या वाटेवर डोळे लावून बसलो होतो
कितीतरी दिसांनी धरती न्हाईल म्हणून शहारलो होतो
तू येण्याच्या वाटेवर डोळे लावून बसलो होतो
कितीतरी दिसांनी माती गंध दरवळील म्हणून मोहरलो होतो
तू येण्याच्या वाटेवर डोळे लावून बसलो होतो
कितीतरी दिसांनी बीज रुजेल म्हणून आसुसलो होतो
तू येण्याच्या वाटेवर डोळे लावून बसलो होतो
कितीतरी दिसांनी हिरवं शिवार दिसलं म्हणून आतुरलो होतो
तू येण्याच्या वाटेवर डोळे लावून बसलो होतो
कितीतरी दिसांनी बायको पोरं हसतील म्हणून आंनदलो होतो
तू नाही आलास पर दुष्काळ आला
कितीतरी दिसांच तू यायचं स्वप्नं पुन्हा भंगल होत..
आसूही आता आटले होते
तू येण्याच्या वाटेवर पुन्हा डोळे लावून बसलो होतो