तू तुझ्यात पहा....
तू तुझ्यात पहा....
केले असशील दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ऊपास तापास' वरतवैकलय, चालली असशील अनवानी, अखंड ज्योतही पेटविली असशील. केली असशील प्रतीष्ठापना, तीची म्हणजेच तुझी तुच काली दुर्गा, भवानी, रणचंडिका ,आणखी काय, काय रूपात संमरागणी तू लढलीस म्हणे.कितीतरी गुनगान तु गातेस निरनिराळ्या मार्गाने तूला भजतेस तू तर जगातल्या समस्त दुष्ट प्रवृत्तीचा विनाश करत आलीये मग तू?तू का नाही पेटून ऊठत तूझ्या घरातलयाच अन्यायाविरूदध का सहन करतेस शब्दांचे घाव जखमी व्हायला शस्रच नाही लागत, शब्द ही घायाळ करतात. अशा जखमांनी ज्या कोणत्याच मलमाने भरून येत नाहीत.तु साक्षात जगतजननी. तु मुलपीठनायिका तूझ्यातच नवनिर्मितीचे दिव्यत्व आदि आणि अंतही तुच मग का ?करत नाहीस प्रतिकार जेव्हा होईल अत्याचार का?जाळुन मारली जातेस. बलात्काराने घायाळ होतेस. शांत राहून सोसतेस सोसतचं रहातेस. पीडयानपीडया उपासना करतेस कुणिही न पाहिलेल्या मानसानं घडविलेलया मूर्तीची याचना करतेस संकट हरणयासाठी स्वतःच्या शरीराला व्रतांच्या नियमात बांधून घेतेस.नाही !मी विरोधी नाहीच तूझ्या या अधिकाराच्या .फक्त तुझ्या अस्तित्वाला दुय्यम का ठरवावे जगाने हा प्रश्न ही निर्मान होऊ दे ना!तूझ्या मनात देवीची किर्ती व गुनगान गाताना ईतकचं!
