तू थांबू नको कुठेही
तू थांबू नको कुठेही
तू थांबू नको कुठेही,
तू चाल जरा पुढे रे
तू आहेस विजेता हा,
विश्वास राहुदे रे
ह्या इतुक्याष्या अपयशाचा ,
इतिहास घडायचा नाही रे.
तू जिद्दी हो असा की,
तू ध्येय गाठशिल रे
जर काटा कधी रुतला,
तुला मऊ स्पर्श वाटू दे
जर थकलास तू कधी,
तुझे स्वप्न पुढे दिसू दे
बघ यश थांबले रे,
इतिहास घडविण्याला.
जा धाऊन तू असा की,
हो भाग एक त्याचा...
