एकटी सावली
एकटी सावली
बावरलेली सांज जशी ती
होती सावली झाडाची,
पाहिले मी दुरून तिला
ऊभी एकटी केव्हाची...
आव आणते हसण्याचे ती
होती सावली झाडाची,
सावरण्याचे करत बहाने
ऊभी एकटी केव्हाची...
कुणासाठी थांबली ती
होती सावली झाडाची,
तिलाही न हे कळले तरीही
ऊभी एकटी केव्हाची...
उन्हाची दिवाणी ती
होती सावली झाडाची,
अंधाराला घाबरत तिथे
उभी एकटी केव्हाची
