कॉलेज..
कॉलेज..
कॉलेज जणू समुद्र ह्याला
फ्रेंडशिप चा किनारा,
मोबाईलवर व्हॉटसअप
नी टिक टॉक चा फवारा,
कॉलेज च्या कॅम्पस मध्ये
प्राचार्यांचा दरारा,
कॉलर ताठ ठेवण्यासाठी
शिस्तीचा मार्गच बरा,
लेक्चर च्या लाटांचा
बेंच वर पसारा,
इंग्लिश आणि अकाउंट चा
पेपर मध्ये घसारा ,
अक्षर जसे मोती आणि
ज्ञान ज्यांचा गाभारा,
तोच खरा राजा आणि
तोच इथे हिरा,
नवी ही सफर तिला
स्वप्नांचा सहारा,
अथांग ह्या सागरा
नाही रे निवारा
नाही रे निवारा
