प्रश्न
प्रश्न
प्रश्न पडला कृषी कन्येला,
हरली उत्तर देताना
दिसेल काहो बळीराजाची
सुखी पहाट होतांना ?
आनंदाच्या पावसामध्ये
पाहिले सारेच भिजताना
त्यानेच कसं पाहिलं नाही
आभाळ भरून येताना
मन मारून जगताना
कधी विष घेताना
पाहिला नाही कधी मंत्री
फास लावून घेताना
रोजच्याच चटक्यांची
त्याला कुठे हाय आहे
तक्रार त्याने केली नाही
माथी ऊन घेतांना
(म्हणूनच )प्रश्न पडला कृषी कन्येला,
हरली उत्तर देताना
दिसेल का हो बळीराजाची
सुखी पहाट होतांना ?
हाच प्रश्न तुम्हालाही
पडतो काहो कधीतरी
पाहिले नाही तुमचेही
(मी) डोळे भरून येताना
