मी पाहिलंय..
मी पाहिलंय..
मी पाहिलंय स्वप्नांना
ताऱ्यांसारखं तुटतांना
मी पाहिलंय स्वतःला
आतल्या आत मरतांना
मी पाहिलंय दिव्यांना
विनाकारण विझतांना
मी पाहिलंय जीवाला
वातीसारखं जळतांना
मी पाहिलंय वादळांना
माझ्या आत फिरतांना
मी पाहिलंय नात्यांना
बंधनात राहतांना
मी पाहिलंय अश्रूंना
डोळ्यामध्ये साठतांना
मी पाहिलंय फुलांना
मातीमध्ये झाकतांना
मी पाहिलयं स्वप्नांना
ताऱ्यांसारखं तुटतांना
मी पाहिलंय स्वतःला
आतल्या आत मरतांना
