STORYMIRROR

Komal Patil

Tragedy Inspirational Others

3  

Komal Patil

Tragedy Inspirational Others

जगणं अजून बाकी आहे

जगणं अजून बाकी आहे

1 min
295

थोडं आयुष्य जगून झालं,

थोडं अजून बाकी आहे

अर्धा ढग बरसून आला,

अर्धा अजून बाकी आहे


काही हातून निसटले पण,

काही अजून बाकी आहे

थोडं जग पाहून झालं,

थोडं अजून बाकी आहे


आता फक्त रडून झालं

हसणं अजून बाकी आहे

उरलेले ते सारे घेऊन,

त्याला जगणं बाकी आहे

जगणं अजून बाकी आहे

जगणं अजून बाकी आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy