STORYMIRROR

Komal Patil

Inspirational

3  

Komal Patil

Inspirational

वाटेवर त्या चालतांना

वाटेवर त्या चालतांना

1 min
135

आज जरी भरकटली भाषा

आर्जवे मी करतांना

मीत असावे स्वप्नांचे

वाटेवर त्या चालतांना

हेच भास भावनांचे


साज व्हावे छेडतांना

धीर असावा सावरण्या ह्या

दुखी मनाच्या यातनांना

जरी दाटले धूकेच सारे

वाटेवर त्या चालतांना


नजरेला आभास व्हावे

स्वर्ग आला भेटीला

जरी भासे आजही तो

क्षण पुन्हा दिसेनासा


हेच असावे ध्येय कायम

निर्णय अंतिम घेतांना

जरी आला अंधार फिरुनी

वाटेवर त्या चालतांना

सावलीने साथ द्यावी

पाऊल पुढे घेतांना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational