STORYMIRROR

Komal Patil

Tragedy Others

3  

Komal Patil

Tragedy Others

माणसाची जात..

माणसाची जात..

1 min
240

इथे माणसाने केला माणसाचा घात,दे

व नाही देवा मी तर माणसाची जात.

कसे पाहू तुला देवा बंद झाली तुझी दारं

जिथे टेकला मी माथा तिथे तुझा सहवास

कुणी म्हणे माणसात देव आम्हा दिसतो

जीव घेणारा जीव सुद्धा देव कसा होतो?

सरला तो काळ देवा वेगळी ही वेळ

इथे क्षणाच्या सुखाचा ठरवला जातो भाव

ऐकशील ना रे मला जरी मी नाही संत

देव नाही देवा मी तर माणसाची जात

वेचले मी फुले देवा परक्याच्या अंगणीचे

कसा झेलनार पुण्य परक्याच्य पदरीचे

सुख कमावण्या देवा विकले मी माझे हसू

पुर आसवांचे आता सांग मी कसे रोखू

करुनिया प्रार्थना मी पुन्हा पसरले हात

पुरे उपकार आता क्षमा द्यावी पदरात

ऐकशील ना रे मला जरी मी नाही संत

देव नाही देवा मी तर माणसाची जात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy