तु सोबतच रहा...
तु सोबतच रहा...
पाहुन तुझं रूप
मी हरवतो खुप
गालातलं हसु तुझ्या
मजला करत चुप
मनामंधी तुच माझ्या
किती बोलु नयनात
चल धरूनिया हात
आपण रमु एकमेकांत
ओढ सतावते बघ
दोन्ही मनाची मनाला
गोडी वाढतच जाते
हर क्षणाला क्षणाला
किती अडचणी आल्या
त्या सोडवुनी दिल्या
भरोश्याचा खांदा तिथं
होता डोकं टेकायाला
सुख दुःखाचा प्रवास
केला हसुनिया पार
सुखी जीवनाचं बघ
आता उघडलं दार
जीवन सुगंधित झालं
दारी फुल उमलता
मन दरवळुन गेलं
डोळे मिटता मिटता
साथ दिली एकमेकां
बांधुन जन्माची गाठ
तु सोबतच रहा
चालु समतेची वाट
सोहळा हा प्रेमाचा
करू आपण साजरा
प्रेम, विश्वास, आनंदाचा
उधळु या रंग जरा

