STORYMIRROR

Sarika Musale

Inspirational

4  

Sarika Musale

Inspirational

तू नसताना

तू नसताना

1 min
1.0K

तू नसताना



तू नसतानाही 

मन दुःखी होई

तुझ्या विरहात

नेञी पाणी येई


चांदण्या रुसल्या

दिसेनाशा झाल्या

गर्द तिमिरात

लपून बसल्या


मुक्या कळ्यांनाही

फुलने कळेना

तुझ्या विरहात

बहर येईना


आठवणी तुझ्या 

मनी दाटवल्या

तुझ्या येण्याची रे

वाट पाहू लागल्या


प्रेमळ बोल ते

मनी आठवले

ओढ मिलनाची

नेञ आतुरले


साथ तुझी माझी

सात जन्माची रे

नको हा दुरावा

लवकर ये रे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational