तू नसल्यावर
तू नसल्यावर
अगदी एकटं नको नकोसं होई
माझ्यासवे तू नसल्यावर |
सारे कसं नवनवं, हवहवं
वाटतं संगतीला तू असल्यावर | |१| |
अंधारुन येते उजेड असतांना
विरहात निराशा दाटे मनी |
सखे आठवत तुला बसतो मी
प्रतिक्षा करत प्रत्येक क्षणी | |२| |
रोजचं जगणं होतं कंटाळवाणं
असते जेव्हा मजपासून दूर |
सारे काही जवळ असतांना
मला वाटते तुझीच हूरहूर | |३| |
तू वेड मजला लावले तुझ्या
शिवाय वाटे अशक्य जगणं |
ये लवकर भेटाया मज प्रिये
बंद करी मजवरी असं रूसणं | | ४| |