तू म्हणजे
तू म्हणजे
तू म्हणजे..
चिमण्यांच्या चिवचिवाटाने गजबजलेली पहाट
तू म्हणजे..
अथांग अशा सागराची सळसळणारी लाट
तू म्हणजे ..
गंध कस्तुरीचा
जणू काही स्पर्श मखमलीचा
तू म्हणजे..
कानाजवळ कुजबुज करणारा हा उनाड वारा
तू म्हणजे..
शांत आणि स्तब्ध असलेला सागरी किनारा
तू म्हणजे..
प्रभात समयी उगवलेले
गुलाबाचे फूल
तू म्हणजे..
शांततेत येणारी प्रेमाची चाहूल
तू म्हणजे..
ओठांवर गुणगुणणारी
प्रेमाची गाणी
तू म्हणजे..
नदीच्या ओढ्यातील
सळसळणारे पाणी
तू म्हणजे..
स्वप्न दाखवणारी रजनी
तू म्हणजे..
अवकाशात लुकलुकणारी चांदणी
तू म्हणजे..
अंधारलेल्या माझ्या जीवनाला प्रकाशमय करणाऱ्या दिव्याची वात
तू म्हणजे..
माझ्या हरलेल्या मनाला
विजयापरी दिलेली साथ...
