तू माझी राणी
तू माझी राणी
सुखी संसाराची गाऊया गाणी
मी राजा गं तू माझी राणी ------||धृ||
घेेईन तुझ्यासाठी पैठणी साडी
राहण्यास तुजला मी बांधीन माडी
रोज भरीन मी नळचं पाणी -------- ||१||
तू माझी मैना गं मी तुझा राघू
थोड कर माफ मला असी नको वागू
नको धरू राग माझा मनी ------------ ||२||
तुझ्यासाठी चार चाकी घेईन मी गाडी
करू नको कुरबुर लाजधर थोडी
का डोळ्यात आनतेस पाणी ---------- ||३||
तू माझी बायको गं मी तुझा नवरा
समजु नको मला पायतला भवरा
किती मंजुळ गं तुझी ही वाणी ---- ||४||
किती गोड सजणे आपल हे बाळ
लाडाने कर तू त्याचा गं संभाळ
नको बोलू तू रागावूनी ----------- ||५||
तुझ्या सुखासाठी मी करीन मेहनत
रात दिस कामकरून भिजल घामात
करू नको तू वेडयावाणी ------------- ||६||
पैसा कमवून बांधील बंगला
सुखी संसार थाटू गं चांगला
सोड माहेरच्या गं आठवणी ---- ||७||
विसरून दुःख सारे मिळविण सुख
राबुन रानामंधी पिकविन पिक
करीन ज्यारीची मी कापनी ----- ||८||