तू माझी ललना सोन्याची.
तू माझी ललना सोन्याची.
तुझी पैठणी हिरवी,
किनार मोत्याची,
तू माझी ललना,
सोन्याची.
तुझी चाल तिरकी,
पदी माळ घुंगराची,
तू माझी ललना
सोन्याची.
तुझा पिसारा मोराचा,
उडी हरणाची,
तू माझी ललना
सोन्याची.
तुझे केस काळे,
कमर फोकाची,
तू माझी ललना
सोन्याची.
तुझी नथनी पिवळी,
मुडा नाकाचा,
तू माझी ललना
सोन्याची.
तुझे डाग पुतळ्याचे
भाळी कुंकू माझे,
तू माझी ललना
सोन्याची.
तुझे गाल गुलाबी,
पप्पी पाठ्याची,
तू माझी ललना
सोन्याची.
तू धुंध माझी,
नको बाटली, मद्याची,
तू माझी ललना
सोन्याची.

