STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Action Others

2  

Anjali Bhalshankar

Action Others

तू लिहित केलस....

तू लिहित केलस....

1 min
7

  • तू लिहिता केलस मला खिडकीतून पाहत असलेल्या रोमँटिक मड मुळीच नाही बाबा!
  •  घराच्या गळक्या छतातून धो धो बरसत असताना कोरडा कपडा शोधताना आईची धांदल उडायची ना तेव्हा!
  •  तिच्या पदराआड घट्ट मिठी मारून बिलगण्यासाठी आम्हा भावंडांची होणारी पळापळ आणि माझ्या स्वाभिमानी गरीब बापाची झुकलेली अपराधीपणाची नजर.......
  •  बाप म्हणून कमी पडत असल्याची भावना अजून नाही तू आलास की काळजाला जाऊन भिडते आणि मग मी लिहिते........
  •  एक आताही मी मनसोक्त भिजते आतून-बाहेरून ओलीचिंब होते छत्री विसरून काही काम आठवते
  •  तुझ्या येण्याची चाहूल लागायचा अवकाश मी बाहेर पडते मुद्दाम खोटं बोलून तसे वयानुसार खोटं बोलायला छान जमते आता मला 
  • माझे अश्रु तुझ्या पाण्याच्या थेंबात मिसळून मला लपवायचे असतात ना मग मी लिहिते 
  • आता घर इतकं मोठ की बाहेर तू कधी येऊन गेलास हे कळत नाही खिडकीतून येणाऱे तुझे तुषार झेलता येत नाही त्यासाठी फाटका बाहेर जावं लागतं दूर-दूर
  •  लहानपणीचा आईचा पदर , उडणारी धांदल परत मिळेल का रे ?हे सारे आठवून मन उदास होते मग मी लिहिते 
  • दूर निघून गेलेल्या आईचा पदर, बापाची ती चोरटी नजर, खोलीभर ठेवायला भांड्यांची शोधाशोध या साऱ्यातून घेतलेला खूप खूप शिकून मोठं होण्याचा बोध....
  •  हे सारं तू दर वेळेस परत घेऊन येतो आठवणींनी मन उदास होते मग मी लीहीते आजही तु पुर्वी सारखाच येतोस मात्र तो ऊबदार पदर नाही आईबाप ही नाहीत बापाची नजर नाही आईची धांदल नाही... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action