STORYMIRROR

Dinesh Kamble

Romance

3  

Dinesh Kamble

Romance

तू आहेस म्हणून

तू आहेस म्हणून

1 min
1.0K


माझ्या आयुष्यात साजणी.

आहे बारोमास वसंत...

शिशिर मोजण्याची येथे.

कुणा आहे ग उसंत..!


कधीकधी मीच माझा हसतो.

तुझे आठवत असतो किस्से..

तू खुलवले आहे साजणी

माझ्या चेहऱ्यावर हे हसे..


वाटतो आसमंत सुद्दा खुजा.

तुझ्यामाझ्या प्रेमापुढे..

मला जन्म लाभला दुजा.

प्रिये फक्त तुझ्या प्रेमामुळे..


मी बेलाशक करतो सामना.

जीवनातल्या वादळांचा सुद्दा..

प्रियतमा , तुझ्याच प्रेमामुळे

बाहु ताकदवान झाल्या बहुदा..


स्वप्ने मी ही रंगवत असतो.

उद्याच्या सुखी संसाराची...

मला विश्वास आहे पूर्ण

पूर्ण होईल आस मनाची...

तू सोबतीला आहेस म्हणून.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance