STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

2  

Sunita Ghule

Inspirational

तुम्हा वंदितो सैनिका

तुम्हा वंदितो सैनिका

1 min
251


निसर्गाचा झाला कोप

हानी झाली ही अपार

नदी नाले झाले एक

जल भरे आरपार।


रस्ते, घरे, गोठे, शाळा

शिवाराची इथे दैना

उभी पिके वाहताना

दृश्य डोळा देखवेना।


अडकले पुरामध्ये

सान,थोर, चिमुकले

कशी होईन सुटका

अश्रू डोळयात दाटले।


हात आधाराचा देण्या

तेव्हा धावले जवान

तुम्हां वंदितो सैनिकां

देवाहुनी तू महान।


पाठीवरी,कडेवरी

कुणा घेई होडीमधी

संकटात धावलाशी

भयानक पुरामधी।


सदा सेवेस तत्पर

कसे फेडू सांग ऋणा

देवदूत भूमीवरी

दाविलेस जग पुन्हा।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational