STORYMIRROR

Jyoti gosavi

Tragedy

4  

Jyoti gosavi

Tragedy

तुला सवय जडली दारू पिण्याची

तुला सवय जडली दारू पिण्याची

1 min
425

रंगवली होती कीत्येक स्वप्ने

सुखी संसाराची

आसं होती मजला

तुझ्याच प्रेमाची

आवड होती मजला

तुझ्या समवेत राहण्याची

परंतु तुजला सवय जडली

दारू पिण्याची


काडी काडी जमवून मी

संसार होता मांडला

परंतु तुझ्या व्यसनापायी

रस्त्यावरी तो सांडला

विकली सारी भांडीकुंडी

वेळ आली घटस्फोट घेण्याची

कारण तू जरा सवय जडली

दारू पिण्याची


भविष्य माझ्या सोनुली चे

सुरक्षित करण्यासाठी

लागले मग मी ही

काडीमोड घेण्याच्या पाठी

तोडले मग बंध सारे

सोडल्या जन्मोजन्मीच्या गाठी


नको लागू तू पुन्हा

आता आमच्या पाठी

आण आहे तुजला

सोनुलीच्या प्रेमाची

कारण तू जरा सवय जडली

दारू पिण्याची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy