STORYMIRROR

Pandit Warade

Romance

3  

Pandit Warade

Romance

तुला पाहता

तुला पाहता

1 min
14.9K


सायंकाळी तुला पाहता मनोनिराशा मावळली

मावळत्या सूर्याची पसरली लाली तव गाली.


गालावरचा तीळ, घालतो शीळ खुपतो ऊरी

ऊरात घेऊन जखम वेडा पीर फिरतो रस्त्यावरी.


रस्त्यावरचे लोक होतसे दंग बघून तव रंग

रंगाचा करी बेरंग परी तव किंचित उघडे अंग.


उघड्या अंगावरी बघ कितीतरी खिळती नजरा

नजरा न जराही ढळती अवतीभवती किंचित जरा.


जराशीच तव हले पापणी हळूच खालीवरी

खालीवर होतो जीव बसतसे घाव हृदयांतरी.


हृदयांतरीच्या भाव भावना कुणास सांगू आता

आता तरी पंडितास दिलासा देई जाता जाता.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance