तुझ्यासाठी...
तुझ्यासाठी...
पहाटे पहाटेचा गारवा
साखरझोपही धुंद
स्वप्नात बुडाले तुझ्यासाठी
लेवुनी मी गुलाबी पंख
सोनेरी रविकिरणांची नांदी
अंगणेही दव पिऊनी तृप्त
किणकिण कांकणाची तुझ्यासाठी
सजले मी मनसोक्त
आंधण चुलीवरचे नादावले
जिव्हाही आतुर होऊनी धुंद
खमंग मेजवानी तुझ्यासाठी
बनविता मी रूचकर मिष्टान्न
कातरवेळी दिव्यांनी ऊजळली
तुळस दारातली प्रसन्न
मनोभावी प्रार्थना तुझ्यासाठी
पुजिली मी एकचित्त
रातराणी लोभस गाई
प्रितीचे मोहक नवतराणे
चांदरातही सजली तुझ्यासाठी
ओजंळीत दावता मी नजराणे

