तुझ्यापासून दूर आहे
तुझ्यापासून दूर आहे
तुझ्यासाठीच तुझ्यापासून
सखे मी दूर आहे
परिस्थितीमुळेच आज थोडा
समजून घे मजबूर आहे ||0||
प्रेम करताना सखे इथे
आयुष्यही बघावं लागतं
सगळंच मिळत नाही इथे
मन मारून जगावं लागतं
तुला नक्की वाटेल प्रिये
मी थोडा मग्रूर आहे
परिस्थितीमुळेच आज थोडा
समजून घे मजबूर आहे ||1||
जबाबदाऱ्या पेलवायच्या
आहेत खडतर इथे
आयुष्याच्या वाटेवर
भेटतात अडसर इथे
तुला वाटेल स्वप्न आपलं
होत चक्काचूर आहे
परिस्थितीमुळेच आज थोडा
समजून घे मजबूर आहे ||2||
येईन मी परत तेंव्हा
कधीच तुला सोडणार नाही
वचन दिलं तुला ते
कधीच मी मोडणार नाही
तूच माझी सरगम आणि
तूच माझा सूर आहे
परिस्थितीमुळेच आज थोडा
समजून घे मजबूर आहे ||3||
तुझ्याविना जगतोय कसा
कसं तुला सांगू मी
तुझ्यासाठी बेफिकीर
सखे कसा वागू मी
जग सारं क्लिष्ट तू
चंदनाचा धूर आहे
परिस्थितीमुळेच आज थोडा
समजून घे मजबूर आहे ||4||
तुझ्यासाठीच आयुष्याला
कलाटणी देताना
दुःख तुझी मागून माझी
सुखं तुला देताना
प्रेम तुझं विसरू कसा
जग सारं क्रूर आहे
परिस्थितीमुळेच आज थोडा
समजून घे मजबूर आहे ||5||
