तुझ्या विना
तुझ्या विना


तुझ्या विना एकही क्षण
प्रिये मी जगलो नाही
नाराज होते मन माझ्याशीच
तुझ्या विना गं सखी
तुझ्या प्रेमात रंगूनी
मी न माझा राहिलो
माझेच माझ्यात ना काही
मी पुरता तुझाच झालो
कितीदा प्रेम करावे तुझ्यावर
नेहमी ते नवीन वाटते
तुला पाहिल्यावर नेहमी
हे हृदय नव्याने प्रेमात पडते
तुझ्या विना आता
मला चैनच पडेना
किती आनंदी क्षण असो
जगावासा वाटेना
तुला भेटून माझी ही
जिदंगीच पुरती बदलली
हृदयाची स्पंदने पण ही
नव्याने धडकू लागली
तू असतेस सोबत तेव्हा
जीवन हे जीवन वाटते
तुला मिळवून सगळेच मिळाले
ना आता काही हवे वाटते