तुझ्या ओढाळ नजरेतून
तुझ्या ओढाळ नजरेतून
किती आश्वासक असतो
तुझा कोमल हात
जेव्हा तो विसावतो
माझ्या हतबल खांद्यावर
तसाच थबकून राहतो मी क्षणभर
कसाबसा सावरतो स्वतःला
अन वाचत राहतो
तुझ्या ओढाळ नजरेतून
ढसाढसा ओसंडणारी
एक तरल कविता
जी सांगून जाते बरंच काही
कोणत्याही शब्दावाचून

