STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

4  

Manisha Wandhare

Abstract Romance

तुझ्या माझ्या प्रेमाचे

तुझ्या माझ्या प्रेमाचे

1 min
8

हळुवार जपुन स्वप्नांच्या वाटेने जाताना,

तु समोर आला मन पिंजऱ्यातुन उडताना,

मन स्वच्छंदी गाते तुझे सुर छेडताना ,

तु फक्त माझा सख्या स्वप्न जागे होताना ...

माझा होशील का? प्रेमात पडशील का?

तुझ्या माझ्या प्रेमाचे तराणे गाशील का?

सांग येशील का? ...

रंग केशरी क्षितीजावर पसरताना ,

सांज हरवुन डोळ्यात लपताना ,

अलगद नदी समुद्राला मिळताना ,

तु फक्त माझा सख्या स्वप्न जागे होताना ...

माझा होशील का? प्रेमात पडशील का?

तुझ्या माझ्या प्रेमाचे तराणे गाशील का?

सांग येशील का? ...

हिरव्या पानातुन गळताना ,

मुळे प्रेमाची मनात घट्ट होताना ,

ओलावा डोळ्यात भरताना ,

तु फक्त माझा सख्या स्वप्न जागे होताना ...

माझा होशील का? प्रेमात पडशील का?

तुझ्या माझ्या प्रेमाचे तराणे गाशील का?

सांग येशील का? ...

चंद्र पुणवेचा डोळ्यात समावताना,

ही रात्र चांदणी प्रेमात भिजताना ,

कुस विरहाची सोसुन मोगरा फुलताना,

तु फक्त माझा सख्या स्वप्न जागे होताना ...

माझा होशील का? प्रेमात पडशील का?

तुझ्या माझ्या प्रेमाचे तराणे गाशील का?

सांग येशील का? ...

नकळत तुझा छंद लागताना,

ओठावर तुझेच गित फुलताना,

जवळ घेत पापण्या डोळे सांभाळताना,

तु फक्त माझा सख्या स्वप्न जागे होताना ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract