तुझ्या गेल्यानं .........
तुझ्या गेल्यानं .........
तुझ्या गेल्यानं कुणाचं काही अडलं नाही
माझ्याकडे मात्र माझंच काही उरलं नाही
तू गेली सर्व गेलं
तू गेली सर्व गेलं राहिल्या फक्त आठवणी
आठवून बघतो कधी कधी सांभाळलेल्या साठवणी
का कुणास ठाऊक का असं घडलं असेल
माझ्या विश्वासाचं दोर माझ्याच फंदी पडलं असेल
प्रेमाच्या या आगीमध्ये मन विळघळलं असेल
तुझ्या डोक्यात काही तरी भलतं विचार नडलं असेल
तू मात्र गेली
तू मात्र गेली तुला दोष देणार नाही
माझ्या नशिबाचे भोग मला टाळता येणार नाही
बघतो मीही आता अंत माझ्या एकट्या जगण्याचा
तुझ्या अशा जाण्यामागे माझं हित जपण्याचा
तुझ्या माझ्या नात्यामध्ये गुपित काही दडलं असेल
मला सोडून जातांना मन तुझंही रडलं असेल
संप म्हणावं एकदाचं
संप म्हणावं एकदाचं जीवनाशी का बंड हवे
सारखे मनाला टोचणारे आठवणीचे कंट हवे
सारे दिवस विसरून गेलो तवसंगी घालवलेले
आग लावली पत्रांना एकमेकांना पाठवलेले
तुला वाटतं तुझ्या गेल्यानं मन माझं घाबरलं असेल
बघून तुझा शेवटचा चेहरा भान माझं हरवलं असेल
शेवट ठरली स्वार्थीच तू
शेवट ठरली स्वार्थीच तू न सांगता सोडून गेली
प्रेमळ माझ्या हृदयाचा पिंजरा तू मोडून गेली
प्रेमळ माझ्या हृदयाचा पिंजरा तू मोडून गेली
