तुझी नी माझी भेट ती...
तुझी नी माझी भेट ती...
तुझी नी माझी भेट ती
कशी विसरावी सांग जरा
आठवणींच्या लोलकातला
आहे मोती खास खरा
आठवते लखलखणारे डोळे
चेहऱ्यावरले गोड हासू
वाटते मज कधीच ना
या आठवणींना पूसू
अनोळखी होतो जरी
वाटली मज ओळख जुनी
तुझ्या माझ्या बोलण्यात
नव्हते आजूबाजूला कुणी
तरीही नव्हती भीती मनात
नव्हते वाटत नवल कसले
वरवरच्या जरी गप्पा होत्या
नव्हते खाणाखुणांचे वादळ तसले
आठवते मज भेट आपली
फुलाफुलांनी सजलेली
शब्दांच्या पलीकडे जाऊन
प्रेमळ क्षणात भिजलेली

