STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Romance

4  

Sarita Sawant Bhosale

Romance

तुझी आठवण

तुझी आठवण

1 min
710

रिमझिमत्या सरी बरसता, छळते तुझी आठवण

कातरवेळी डोळ्यात उभी आसवांची साठवण

तू नसतानाही सोबतीला तुझाच भास मनात

माझ्या फक्त तुझीच आस आला

लुकलूकणारा चंद्र नभी, आठवण तुझी बेधुंद करी

सख्या हृदयी वसली तुझीच छबी

निशिंगध चोहीकडे सुगंध पसरी,

हळुवार वाऱ्याची झुळुकही नाचरी

आठवणींनी तुझ्या मोहरली ही बावरी

उधळती इंद्रधनू सप्तरंग आकाशी,

बेभान लाटा उसळती मनी गोड गुलाबी

आठवणींची तुझ्या मैफील सजे ही गाली

एकांतात भेट होई अशी तुझी माझी,

जाते मी भान हरपुनी आठवणींनी

तुझ्या हास्याची खुले कळी नजर

भिरभिरे क्षितिजापाशी, भावनांचा कल्लोळ माजे

स्वप्नदेशी आठवणीत तुझ्या

अशी गुंतते मी हरएक श्वासात फक्त तुझाच ठाव घेई


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance