तुझा हेवा
तुझा हेवा
देखणे हे तुझे रुप
पाहून जळतात खूप
दृष्ट लागेल ग जगाची
गालावर तीट हवा......
रुप तुझे डोळ्यापुढे
सहवास तुझा हवा
रात्रंदिन ध्यान तुझे
मन करतंय तुझा धावा.......
माझ्या हृदयाच्या कुपीत
तुझ्या प्रितीचा ठेवा
जग फिरतेय तुझ्या मागे
करीत तुझा धावा........
